Maharashtra news : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस भरतीसंबंधी मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील पोलिसांच्या रिक्त जागांपैकी सात हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी पूर्वीच सांगितले होते. आता ही भरती १५ जूनपासून सूरू करण्यात येणार असल्याची घोषणा वळसे पाटील यांनी केली आहे.

राज्यातील पोलिसांची पन्नास हजार पदे रिक्त आहेत. त्यातील साडे पाच हजार पदे भरण्याचा टप्पा यापूर्वीच राबविण्यात आला. तो आता पूर्ण होत आहे. पुढील सुमारे ७२०० पदांच्या भरतीचा टप्पा १५ जूनपासून सुरू होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन आणखी १५ पदांची भरतीही लवकरच केली जाणार असल्याचे वळसेपाटील यांनी जाहीर केले आहे.
पोलिस भरती होणार या अपेक्षेने अनेक तरी आधीपासूनच तयारीला लागले आहेत. मात्र तारीख जाहीर होत नव्हती. आता ती तारीख जाहीर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.