अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव क्रुझर जीपचा अपघात; एक ठार, आठ जखमी

Published on -

AhmednagarLive24 : ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत.

अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झालेतर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32),

वेदांत शांताराम घन ( वय 14), खुशी शांताराम घन (वय 11), राजपाल अशोक पवार (वय 15), राजगुरू कैलास पवार ( वय 22), कैलास अर्जुन पवार (सर्व रा. जामनेर ता. जामनेर) हे जखमी झाले आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावर खोसपुरी (ता. नगर) शिवारात आज पहाटे हा अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

खोसपुरी शिवारातील हॉटेल संग्राम पॅलेस समोर उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच 14 एचयु 0227) क्रुझर गाडीने (एमएच 16 एटी 1406) भरधाव वेगात पाठीमागून जोराची धडक दिली. क्रुझर गाडी अहमदनगरकडून औरंगाबादकडे चालली होती.

अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला. जखमी मधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe