Successful Farmer: 12 लाखांची नोकरीं सोडली अन ‘या’ इंजिनिअरने सुरु केली सेंद्रिय शेती; आता करतोय 15 लाखांची कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Successful Farmer: लाखोंची नोकरीं, एसी मध्ये बसून काम, शहरातले आरामाचे जीवन एवढं सोडून कोणी एक अवलिया शेती (Farming) करतोय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडून येतात.

असंच काहीसं समोर येतंय मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील शिंदवाडा जिल्ह्यातून. जिल्ह्यातील मौजे खजरी येथे राहणारे राहुल वसुले हे पेशाने इंजिनिअर आहेत. आपल्या विदर्भच्या नागपुरातील कोराडी पॉवर प्लांट मध्ये चांगल्या तगड्या पॅकेजवर नोकरी करत होते.

कोराडी पावर प्लांट मध्ये राहुल असिस्टंट इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. मात्र राहुल यांच्या जीवनात दोन घटनांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. या दोन घटनामुळे रासायनिक खतांनी पिकवलेला भाजीपाला आणि फळे खाणार नाही आणि कुणाला खाऊ देणार नाही, अशी शपथ राहुलने घेतली. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित जमिनीवर सेंद्रिय शेती (Organic Farming) सुरू केली. शेण व गांडुळ खताशिवाय भाजीपाला, धान्य व इतर गोष्टी वाढत आहेत. राहुल वर्षाला 12 ते 15 लाख रुपये नफा देखील कमवत आहेत.

राहुल वसुले यांनी 2008 मध्ये नागपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधून बी-टेक केले. 2014 मध्ये, लॅन्को इन्फ्राटेक लिमिटेड पॉवर प्लांट,कोराडीमध्ये 12 लाखांच्या वार्षिक पॅकेजसह सहाय्यक व्यवस्थापक म्हणून रुजू झाले.

कर्करोगाने पिता-पुत्राचा जीव घेतला
राहुलच्या वडिलांचे 2003 मध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाने निधन झाले. 2014 मध्ये लग्नानंतर मुलगा झाला. 2018 मध्ये ब्रेन ट्यूमरमुळे 3 वर्षांच्या कोवळ्या वयात त्याचा मृत्यू झाला. यानंतर राहुलची जनुकीय चाचणी केली असता, त्यात पॉझिटिव्ह आल्यानंतर तो सेंद्रिय शेतीकडे वळला.

आधी वडील, नंतर निष्पाप मुलाच्या मृत्यूने राहुलला धक्का बसला आणि तो नोकरी सोडून छिंदवाड्यात आला. पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर हा कर्करोगाचा घटक लक्षात घेऊन शेतात रासायनिक खतांचा वापर करणार नाही, अशी शपथ घेतली. केवळ सेंद्रिय शेती करून लोकांना जागरूक करणार असा ध्यास राहुलने घेतला अन आता सेंद्रिय शेतीत राहुल चांगले नेत्रदीपक यश संपादन करत आहेत.

नोकरी सोडून वडिलोपार्जित जमिनीवर पिके घेतली
मित्रांनो राहुलने 2018 मध्ये 10 एकर जमिनीत सेंद्रिय शेती सुरू केली. राहुलने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्रात नागपूर येथून प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

नोकरीवर असताना ते कंत्राटावर शेती द्यायचे. या कारणास्तव रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची खत क्षमता कमी झाली. अशा स्थितीत राहुल यांनी जमिनीची तपासणी केली आणि जमिनीसाठी आवश्यक त्या पोषक घटकांची पूर्तता केली.

12 ते 15 क्विंटल गव्हाचे उत्पादन
राहुल यांनी सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी त्यांना मोठी निराशा हाताला आली कारण की त्यांना शून्य उत्पादन मिळाले. एक एकरात अवघ्या दोन क्विंटल मक्याचे उत्पादन खरंच खुप निराशाजनक होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून उत्पादनात हळूहळू वाढ होऊ लागली.

आता एकरी 12 ते 15 क्विंटल गव्हाचे उत्पादन होत आहे. नैसर्गिक शेतीमध्ये खर्च कमी करून नफा वाढविला जातो. लोकांमध्ये सेंद्रिय पदार्थाबाबत जागरूकता वाढल्याने ग्राहक थेट खरेदी करतात. राहुल वसुले हे श्रीराम ऑरगॅनिक फार्मर ग्रुपच्या नावाने पॅकिंग करून उत्पादने बाजारात विकत आहेत. त्यांना त्यांच्या उत्पादनातून वर्षभरात 12 ते 15 लाख रुपये मिळतात.

भाजीपाला लागवडीमुळे उत्पन्न वाढले
राहुलने अर्धा एकर जागेवर चार लाख रुपये खर्चून पॉली हाऊस बांधले आहे. हे पॉली हाऊस एमएस पोल, शेड नेट, क्लॅम्प्स, क्लिप आणि स्क्रूच्या मदतीने स्वतः बनवलेले आहे. पॉली हाऊसमध्ये मल्टी क्रॉप पद्धतीवर भाजीपाल्याची लागवड राहुल करत असून यातून देखील 3 लाखांची कमाई करत आहेत. राहुल सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करत आहेत. गायीच्या शेनापासून, गोमूत्रापासून, कडूलिंबापासून तयार कीटकनाशक वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe