Ahmednagar News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाविक तुळजापूर देवदर्शन करून नगर औरंगाबाद रोडने शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना आज दि. 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास पांढरीपुल येथे क्रुझर व ट्रकचा भीषण अपघात झाला
यामध्ये क्रुझर या चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या शांताराम घन यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी नाना पाटील (वय २७), नंदा शांताराम घन (वय ३२), वेदांत शांताराम घन ( वय १४), खुशी शांताराम घन (वय ११), राजपाल अशोक पवार (वय १५), राजगुरू कैलास पवार ( वय २२), कैलास अर्जुन पवार ( सर्व रा. जामनेर तालुका जामनेर) हे जखमी झाले आहेत
त्यानंतर तातडीने जखमी झालेल्या सर्व भाविक रुग्णांना उपचारासाठी शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदीप सुराणा यांनी तातडीने सर्व रुग्णांवर प्राथमिक उपचार केले
अपघात झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले सदर घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी तात्काळ हॉस्पिटलचे संचालक डॉ.संदीप सुराणा यांच्याशी संपर्क साधून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे यांनी सदर रुग्णांची भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली.