आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सीनानदी पूर नियंत्रण रेषे बाबत फेर सर्वेक्षणाचा प्रश्न लागला मार्गे

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नगर शहरातून वाहत असलेली सीनानदीचे कार्यक्षेत्र सुमारे १४ किलो मीटर असुन शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते

त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीच्या पूर रेषाची हद्द सुमारे ५०० मीटरच्या दरम्यान असल्यामुळे सेना नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नाही

या अशा नियमामुळे सुमारे शहरातील 50 टक्के नागरिकांना यापूर नियंत्रण रेषेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे दि.२५ मे रोजी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दालनात या पूर नियंत्रण रेषा शिथिल करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आ.संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार सीना नदीच्या पूर नियंत्रण रेषा बाबत फेर सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले याच बरोबर सीना नदी खोलीकरण व रुंदीकरणासाठी लागणाऱ्या निधीसाठी तातडीने अंदाजपत्र तयार करण्याचे आदेश दिले

व लवकरात-लवकर हे अंदाजपत्रक सादर करावे यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली यावेळी आ.संग्राम जगताप तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नगर दौऱ्यावर आले असता त्यांना प्रत्यक्षात सीनानदी पूर नियंत्रण रेषाची घटनास्थळी जाऊन पाहणी केली

सीनानदीचा उगम नगर शहराला लागत असल्यामुळे एकदाही सीना नदीचा पूर शहरांमध्ये पसरला नाही पावसाळ्यामध्ये अनेकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली परंतु हे पाणी शहराच्या कोणत्याही भागात घुसले नाही

या सर्व बाबी शासनासमोर निदर्शनास आणल्या त्यामुळे सीनानदी पूर नियंत्रण फेरसर्वेक्षण आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे अशी माहिती शहराचे आ.संग्राम जगताप यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe