IMD Alert : देशात आता मान्सून चे (Moonson) वारे वाहू लागले आहे. मात्र तत्पूर्वी मान्सून पूर्व पाऊस (Pre Moonson Rain) पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकणी उष्णेतेपासून सुटका मिळाली आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामानखात्याने (Meteorological Department) मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याचा इशारा दिला आहे.
काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा दिल्ली आणि एनसीआरमध्ये उष्णतेमुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. या कालावधीत पाऊस पडला असला तरी त्यानुसार लोक ज्या पद्धतीने आल्हाददायक हवामान शोधत होते, ते त्यांना मिळाले नाही.
तसं पाहिलं तर मुसळधार पावसाने देशाच्या अनेक भागात कहर केला असला तरी उत्तर भारतात मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. आता भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी करताना काही माहिती दिली आहे.
येत्या २-३ दिवसांत केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. याच कालावधीत अरबी समुद्र आणि लक्षद्वीप प्रदेशाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती देखील अनुकूल आहे.
पुढील ५ दिवसांत केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या विविध भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
28 मे ते 1 जून दरम्यान केरळ आणि माहे आणि 30 मे रोजी लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या भागातही पाऊस पडेल
ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत बिहार, झारखंड आणि ओडिशामध्येही जोरदार वाऱ्यासह विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.
उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 28, 30 आणि 31 मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने हिमाचल प्रदेशात पुढील 5 दिवसात पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांच्या समस्या वाढणार आहेत
काही दिवसांनंतर, दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागांमध्ये पावसामुळे तापमान आणि उष्णतेची लाट कमी झाली. हवामान खात्याने पुन्हा संकेत दिले की राष्ट्रीय राजधानीत रविवारी आणि सोमवारी उबदार वाऱ्यांसह तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारीही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.