Maharashtra news : महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात सापडलेल्या कालीचरण महाराज याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इस्लाम हा धर्मच नाही. धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म,’ असं कालीचरण नाशिक दौऱ्यात म्हणाला.
नाशिकमध्ये कालीचरण महाराज याने ग्रामदैवत भद्रकालीचे काल रात्री दर्शन घेवून आरती केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘मुसलमानांनी हिंदूंची ५ लाख प्रार्थनास्थळे फोडली. ती मिळवणे गरजेचं आहे. मुस्लिमांचे १०० टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं.

हिंदू मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये अडकला आहे. इस्लाम हा धर्मच नाही. धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाला तारतील. हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानच आहे. मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे. जो हिंदू हिताचं बोलेल त्याला जाहीर पाठिंबा असेल,’ असं कालीचरणने म्हटले आहे.