Medicinal Plant Farming: ‘या’ औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; वाचा याविषयी

Published on -

Krushi news : शेतकरी मित्रांनो (Farmers) जर आपणांस शेती व्यवसायातून (Farming Business) तुम्हाला चांगले उत्पन्न कमवायचे असेल, तर आपण औषधी वनस्पतींची शेती (Medicinal Plant Farming) सुरू करून चांगला बक्कळ पैसा (Farmers Income) अर्जित करू शकतात.

मित्रांनो स्टीव्हिया (Stevia Medicinal Plant) ही देखील एक प्रमुख औषधी वनस्पतीपैकी एक आहे. या औषधी वनस्पती लागवड (Stevia Farming) शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो खरं पाहता जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत.

त्यामुळे स्टीव्हियाची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी जास्त असल्याने आता आपल्या भारतातही या औषधी वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. जपान, कोरिया, तैवान आणि अमेरिकेत या वनस्पतीची जास्त लागवड केली जाते.

स्टीव्हिया सामान्य साखरेपेक्षा गोड आहे आणि कॅलरी मुक्त देखील आहे. या औषधी गुणधर्मांमुळे स्टिव्हिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्टीव्हिया खूप फायदेशीर आहे. याशिवाय स्टेव्हिया हे रक्तदाब, हिरड्यांचे आजार आणि त्वचा रोगांवरही अतिशय गुणकारी औषध असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारणांमुळे अनेक बड्या कंपन्या स्टीव्हियाची कंत्राटी शेती करून घेत आहेत.

स्टीव्हियाची लागवड कशी करावी?
शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जर आपण एका एकरमध्ये स्टीव्हियाची लागवड करण्याचा प्लॅन बनवला तर आपणास सुमारे 40 हजार स्टिव्हियाची रोपांची गरज भासणार आहे. यासाठी आपणांस सुमारे 1 लाख रुपये खर्च देखील येणार आहे.

स्टीव्हियाची रोपे कलम पद्धतीने तयार केले जाते. स्टीव्हिया रोपातून कलमे कापल्यानंतर ते एका लहान पॉलिथिन पिशवीत किंवा ट्रेमध्ये लावले जाते. हे कलम तयार झाल्यावर कलममध्ये पाने बाहेर आल्यानंतर ते शेतात लावले जाते. झाडे गोटवर लावली जातात. रोपापासून रोपापर्यंतचे योग्य अंतर 15 सेमी आणि गोट ते गोट अंतर 40 सें.मी. असावे असा सल्ला दिला जातो.

कृषी तज्ज्ञांच्या मते, स्टेव्हियाची रोपे लावण्यासाठी फेब्रुवारी-मार्च हा सर्वोत्तम कालावधी आहे. स्टीव्हिया वनस्पती 60 ते 70 सेमी पर्यंत वाढते आणि विशेष म्हणजे ही वनस्पती एकदा लावली की अनेक वर्षे उत्पादन देत राहते. स्टिव्हिया साखरेपेक्षा 25-30 पट गोड आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!