Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक, देर्डे चांदवड आणि देर्डे कोऱ्हाळे या तीन ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजूर झालेला असूनही त्याची उद्घाटने आमदार आशुतोष काळे करत आहेत.
या कृत्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून सदरची भूमिपूजने तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, सेनेचे पालिका गटनेते योगेश बागुल, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी कोपरगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
जल जीवन मिशन योजनेचा निधी केंद्र शासनाचा असुनही शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना या कार्यक्रमासाठी बोलावले नाही, असेही पत्रकात नमूद केले.