Maharashtra news : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या इशाऱ्याची राज्यातील महालिकास आघाडीच्या सरकारने दखल घेतली आहे. हजारे यांच्या मागणीनुसार खरडलेली लोकायुक्त कायदा मसुदा समितीची बैठक ३ जून रोजी पुण्यातील यशदा संस्थेत बोलाविण्या आली आहे.
हजारे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. प्रदीर्घ काळापासून या समितीची बैठक झाली नव्हती. त्यामुळे कायदा तयार करण्याचे काम रखडले होते. त्यामुळे हजारे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ही बैठक तातडीने बोलाविण्याची मागणी केली होती.

जर सरकारने बैठक बोलावून कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली नाही, तर आपण पुन्हा एकदा उपोषणास बसणार असल्याचा इशाराही हजारे यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेले पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले. त्यानंतर मुख्य सचिवांनी यासंबंधीची बैठक ३ जून रोजी पुण्यात आयोजित केली आहे.