उद्धव ठाकरेंच्या कामावर शरद पवार, अजित पवार खुश, तर संजय राऊत म्हणतात..

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (rajya sabha election) संभाजी छत्रपती(sambhaji chhatrapati) यांच्या सहाव्या जागेवरून भाजपवर (Bjp) जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, सातवी जागा ज्यांनी भरली आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय. त्यांच्याकडे तेवढी मते नाहीत. मते असती तर त्यांनी नक्कीच संभाजी छत्रपतींना (sambhaji chhatrapati) उमेदवार केले असते.

आधी संभाजी छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा भाजपने प्रयत्न केला. आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच भाजप राष्ट्रावर बोलते. पण राष्ट्रीय एकतेवर कोणी बोलत असेल तर भाजपला कळत नाही. ते एक जात आणि एक धर्माचं राजकारण करतात. पण ठिक आहे. ती त्यांची विचारधारा आणि त्यांचं राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री आहेत. २५ वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करतात. सोडून द्या. सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.

शरद पवार (Sharad Pawar), सोनिया गांधी, अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे उद्धवजींच्या नेतृत्वावर खुश आहेत. त्यामुळे इतर लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe