काँग्रेसचे महाराष्ट्रात चिंतन, तर दिल्लीत वेगळीच चिंता, हे आहे कारण

Published on -

Maharashtra news : उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर राज्यातील काँग्रेसतर्फे आजपासून शिर्डीत चिंतन शिबीर सुरू झाले आहे.

मात्र, दिल्लीत काँग्रेसमध्ये वेगळ्याच कारणामुळे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे.

या दोघांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.असे असले तरी सोनिया आणि राहुल गांधी या नोटिशीमुळे घाबरणार नाहीत, झुकणार नाहीत आणि छातीठोकपणे लढतील, असं सुरजेवाला म्हणाले.

सोनिया गांधी ८ जूनला चौकशीसाठी हजर होतील, अशी माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी दिली.’द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र होते.

काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe