Maharashtra news : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारकडूनही आता हाचलाची सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राज्याच्या कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलाविली आहे. यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रतिबंधात्मक उपायासंबंधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना कमी झाल्यानंतर मास्कसक्ती हटविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना रूग्णसांख्या वाढली तर मास्क बंधनकारक करण्याबाबत विचार करावा लागेल, असे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत काय चर्चा होते, याकडे लक्ष लागले आहे.