Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी राजमाता आणि महाराणी यांच्याबद्दल अनुदगार काढल्याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये गुरूवारी मोर्चा काढण्यात आला.
खर्डा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आला. तेथे गोटे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.अहिल्यादेवींना फक्त पुण्यश्लोक म्हणा.
त्यांना राजमाता किंवा महाराणी म्हणू नका, असं बोलून तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी उसाच्या खुंटाखुटावर आहेत, असे वक्तव्य गोटे यांनी केले होते.