Maharashtra news : राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्कफोर्सची बैठक घेतली. सध्या तरी मास्कची सक्ती करण्यात येणार नाही. मात्र, लोकांनी मास्क वापरावेत, असे आवाहन बैठकीतून करण्यात आले.
आगामी आठ ते दहा दिवस महत्वाचे असून या काळातील आढावा घेऊन मास्कसक्ती आणि अन्य निर्बंधांसंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन
- कडक निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करावे.
- सक्ती नाही, पण घराबाहेर पडताना मास्क वापरावा
- शाळा सुरू करण्यासंदर्भात सध्या तरी अडचण नाही.
- रूग्णसंख्या वाढल्यास बारा वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे
- राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे