AhmednagarLive24 : जम्मू- काश्मीरमध्ये पंडित आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायावर दहशतवाद्यांकडून हल्ले होत अल्याने भाजप सरकारवर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे.
आपल्या सडेतोड प्रतिक्रियांसाठी ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावरून थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे.
स्वामी म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असतानाही तेथे दररोज काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे. याला जबाबदार धरून गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
त्यांना गृहखात्याऐवजी क्रीडा मंत्रालय द्यावे. असेही आता क्रिकेटला अनावश्यक महत्व दिले जात आहे,’ असा टोलाही स्वामी यांनी लगावला आहे.