Maharashtra news : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क सक्ती होणार का? निर्बंध लावले जाणार का? यासंबंधीची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेऊन या विषयाचे गांभीर्य दाखवून दिले आहे. अशातच आता स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जर आकडे वाढत गेले, तर त्यांचे काय होणार? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंबंधी एक मोठे विधान केले आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील,’ असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
आधीच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबणीवर पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आणखी एक अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.