Maharashtra news : शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात एका मुलाखतीत बोलताना ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी आपल्याला चार वर्षे भेटले नाहीत’, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं.
यावरून मोठी चर्चा सुरू झाल्यानं चव्हाण यांनी आता सारवासारव केली आहे.नाशिकमध्ये यासंबंधी प्रसारमाध्यमांनी चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राहुल यांनी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिलेला आहे.
सोबतच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोरणाच्याविरोधात देशभर फिरत आहेत. परदेशातही जात आहेत. त्यांना दरवेळी भेटण्याची गरज नाही. शिवाय मधल्या काळात कोरोनामुळे कोणीच कोणाला भेटू शकत नव्हते.
शिवाय प्रत्येकवेळी पक्षाच्या कामासाठी आपल्यालाच भेटले पाहिजे असे राहुल यांचे नाही. अन्य पदाधिकाऱ्यांना भेटायला सांगत होते. त्यामुळे माझी त्यांची भेट होऊ शकली नाही, असं मला म्हणायचे आहे.