Successful Farmer: राज्यात गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पीक पद्धतीत नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmers) आता शेतीमध्ये (Farming) बदल करत नवीन नगदी पिकांची शेती (Cash Crop) करू लागले आहेत.
यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) शाश्वत वाढ झाली आहे. खानदेश मधील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील (Bhusawal) एका अवलिया शेतकऱ्याने देखील पारंपरिक पीक पद्धतीत होत असलेले नुकसान बघता रेशीम शेतीच्या (Silk farming) माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवले आहे.
मौजे कुन्हे पानाचे येथील रहिवासी शेतकरी अण्णा शिंदे यांनी ही किमया साधली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कुन्हे पानाचे हे गाव विशेषता नागवेल पानांच्या शेतीसाठी संपूर्ण खान्देशात नव्हे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते.
मात्र गेल्या काही वर्षात या गावातील भूजल पातळीत कमालीची घट झाली असून आता विहिरींचे पाणी कमी झाले आहे. यामुळे येथील शेतकरी बांधव आता पिक पद्धतीत बदल करत आहेत.
अण्णा शिंदे यांनी देखील आपल्या विहिरीतील भूजल पातळी लक्षात घेता कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शेती करण्याचा निर्णय घेतला.
मग काय या अनुषंगाने अण्णांनी शोधाशोध सुरु केली अन शेवटी तुतीची लागवड केली. खरं पाहता अण्णा शिंदे यांनी केलेला हा प्रयोग पंचक्रोशीत नवीनच आहे.
मात्र असे असताना देखील अण्णा यांना रेशीम शेतीतून मिळालेले चांगले बक्कळ उत्पन्न बघता आता गावातील इतर शेतकरी देखील तुतीच्या लागवडीसाठी पुढे सरसावले आहेत.
मित्रांनो तुतीची लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या अडीच एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. मात्र सुरुवातीला कोरोना मुळे अण्णा यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
असे असले तरी स्वभावाने जिद्दी असलेल्या अण्णांनी हार मानली नाही अन पुन्हा जोमाने रेशीम शेतीकडे वळले. शेवटी हार के आगे जीत है या प्रमाणे अण्णा यांना रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले.
शिंदे आपल्या रेशीम कोषाची विक्री जालना येथे करतात. तिथे त्यांना जवळपास 62 हजार क्विंटलचा भाव मिळतो. आण्णा यांच्या मते त्याना रेशीम शेतीतुन एकरी चार लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता अण्णा यांचा संपूर्ण परिवार रेशीम शेतीच्या कामात जुंपलेला बघायला मिळत आहे. निश्चितच अण्णा शिंदे यांनी मिळविलेले हे नेत्रदीपक यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. याशिवाय भविष्यात राज्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड बघायला मिळेल एवढं नक्की.