AhmednagarLive24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम अणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी देत दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार केले आहे.