Share Market Update : सेन्सेक्स-निफ्टीची घसरण सुरूच, जाणून घ्या आजच्या व्यवहाराची सुरुवात

Published on -

Share Market Update: आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली नसून BSE चा 30 समभागांचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स ३९Sensex-Nifty) ०२ अंकांच्या घसरणीसह 55373 स्तरावर उघडला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (national stock market) निफ्टीनेही घसरणीसह दिवसाच्या व्यवहाराला सुरुवात केली.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५१५ अंकांनी घसरून 55157 च्या पातळीवर होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये एनटीपीसी (NTPC) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) वगळता 28 कंपन्यांचे समभाग लाल चिन्हावर होते. त्याच वेळी, निफ्टीही १४६ अंकांनी घसरून 16422 च्या पातळीवर होता.

सोमवारची स्थिती

देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरले आणि बीएसई सेन्सेक्स ९४ अंकांनी घसरला. या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरणाच्या आढाव्यापूर्वी, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे बाजार तोट्यात राहिला आहे.

बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ९३.९१ अंकांनी म्हणजेच ०.१७ टक्क्यांनी घसरून ५५,६७५.३२ अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ४७३.४९ अंकांपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 14.75 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 16,569.55 वर बंद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News