Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Published on -

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली.

वाहकाने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.कल्याण ते अकोले ही अकोले आगराची बस बुधवारी दुपारी सुमारास कल्याणहून अकोल्याकडे येत होती.

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात ठाणे जिल्ह्यातील टोकावडे गावाच्या हद्दीत ही घटना घडली.

बस माळशेज घाट चढत असतानाच वाहक इडे यांनी अचानक घाटातून उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहकाचा मृतदेह शोधून काढला.

तो तपासणीसाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe