अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाकडून पत्नीचा छळ; पत्नीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

Published on -

AhmednagarLive24 : सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी केल्याप्रकरणी नगरसेवकासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे आणि सासू उषा सदानंद उणवणे (सर्व रा. लालटाकी, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २१ मार्च, २०२२ पासून पती अक्षय, सासरे सदानंद, सासू उषा यांनी लग्नानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपासमारीची वेळ आणली. पैशाची मागणी करून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल आव्हाड करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News