Ajab Gajab News : केळीचा वास येताच उंदरांना का येते टेन्शन ? जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

Published on -

Ajab Gajab News : शेतकऱ्यांना सर्वात जास्त त्रस्त करणारा प्राणी (Animal) म्हणजे उंदीर (Rat) होय. अनेक जणांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातही उंदीर होत असतात. मात्र उंदरांना घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो मात्र उंदीर जाता जात नाहीत.

उंदरांबद्दल एक विचित्र गोष्ट समोर आली आहे की ते केळीच्या वासाने घाबरतात. क्युबेकमधील मॅकगिल विद्यापीठातील (McGill University) संशोधकांनी (Researcher) ही अनोखी गोष्ट जगासमोर ठेवली आहे.

संशोधकांनी संशोधनात सांगितले आहे की, उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स (Stress hormones) असतात. योगायोगाने शास्त्रज्ञांना याची माहिती मिळाली. ते गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या उंदरांवर एक प्रयोग करत होते.

यावेळी त्यांना समजले की उंदरांच्या मूत्रात एन-पेंटाइल एसीटेट नावाचे एक संयुग असते, ज्यामुळे उंदरांच्या संप्रेरकांमध्ये बदल होतो. या संशोधनाचे प्रमुख लेखक जेफ्री मोगिल म्हणतात की, त्यांना हे अचानक कळले.

संशोधनानुसार, कुमारी नर उंदीर भ्रूणहत्येसारख्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. अशा स्थितीत उंदीर आपली पिल्ले वाचवण्यासाठी लघवीद्वारे शरीरातून रसायन उत्सर्जित करतो आणि नर उंदीर हा वास घेत त्यापासून दूर जातात.

नेमका हाच वास निर्माण करणारे रसायन केळीमध्येही (Bananas) आढळते. अशा स्थितीत त्यांच्या तणावाची पातळी वाढते.शास्त्रज्ञांनी याची पुष्टी करण्यासाठी केळीचे तेल घेतले, ज्याचा वास अगदी उंदराच्या मूत्रासारखा होता.

तो कापसात टाकून उंदरांच्या पिंजऱ्यात ठेवला. उंदरांना त्याचा वास येताच, उंदराच्या लघवीजवळ जाताना त्यांच्या तणावाची पातळी तशीच वाढली. कुमारी नर उंदरांमध्ये हा ताण जास्त प्रमाणात वाढला होता, म्हणजेच केळीचा वास जर उंदरांपर्यंत पोहोचला, तर नर उंदीर त्या ठिकाणी राहू शकणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe