राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांना अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, त्यांच्या पत्नी आणि पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच भाषणातील एका वाक्याची आठवण करून दिली आहे.

शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यसभेचे निकाल पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की, “उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात…….!!!!” असे पण संभाजीनगर सभेत सत्यच बोलला होतात…ते आज पुन्हा एकदा सर्वांना पटले असेलच….!!!!
औरंगाबादमध्ये नुकत्याच झालेल्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते, उध्दव ठाकरे म्हणून मी शून्य आहे. मध्ये बाळासाहेबांचे नाव आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करता, असे ठाकरे म्हणाले होते. त्याचा संदर्भ राज्यसभा निवडणुकीतील कामगिरीची जोडत शालिनी ठाकरे यांनी ही टीका केली आहे.