Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सून (Monsoon) 10 तारखेला राज्यात दाखल झाला आणि अकरा तारखेला मान्सून मुंबईमध्ये आला. याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली.
मात्र मान्सूनच राज्यात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा (Monsoon News) प्रवास संथ गतीने बघायला मिळत असून अनेक ठिकाणी पावसाने (rain) उघडीप दिली आहे.

यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मान्सूनची आतुरतेने वाट पाहू लागला आहे. राज्यातील शेतकरी बांधव तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व व्यक्ती पुन्हा एकदा मान्सूनच्या अंदाजाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी देखील राज्यातील अनेक भागात अजून मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा बघितली जात आहे. शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व सर्व कामे आपटली असून आता पेरणीयोग्य पावसाची वाट बघितली जात आहे.
दरम्यान आपल्या अचूक हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान मिळवलेल्या पंजाबराव डख साहेबांचा (Panjabrao Dakh) ताजा अंदाज देखील आता समोर आला आहे.
पंजाबराव डख साहेबांच्या (Panjabrao Dakh News) मते, राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. निश्चितचं यामुळे पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.
पंजाबराव यांच्या (Panjab Dakh Weather Report) मते, राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही काळ तो निष्क्रिय होता मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून 17 18 19 आणि 20 या तारखेला मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत मराठवाड्यात अतिरुष्टी सदृश्य पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर कालपासून म्हणजेचं 14 तारखेपासून राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे.
पंजाबराव यांच्या मते, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली तरीदेखील येत्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
शिवाय पंजाबराव यांनी मान्सून बाबत अधिक माहिती देताना सांगितले की या वर्षी मान्सून हा दक्षिणेकडून म्हणजेच सोलापूरकडून राज्यात दाखल झाला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतीय हवामान विभागाने तसेच महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकरी बांधवांना 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला आहे.
शिवाय राज्याचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी देखील शेतकऱ्यांना असाच सल्ला दिला आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केल्यास त्यांना दुबार पेरणी करण्याची देखील नामुष्की ओढवू शकते.
यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो शिवाय त्यांची मेहनत देखील वाया जाणार आहे आणि महत्त्वाच म्हणजे शेतकऱ्यांची किमती वेळ देखील यामुळे वाया जाणार आहे.
निश्चितच पंजाबरावांच्या या सुधारित अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकरी बांधव आता पुन्हा एकदा नवीन जोमाने पेरणीपूर्व कामासाठी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.