दीपाली सय्यद यांना मोदींवर दगडफेक करायची होती, एसपीजीला शंका

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रच्या दौऱ्यावर आले होते. पुणे जिल्ह्यातील देहू आणि मुंबईत त्यांचे कार्यक्रम झाले. यावेळी त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.यामध्ये शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यासंबंधी एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लिगल राईटस ऑब्जरव्हरी नावाच्या एका संस्थतर्फे यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दगडफेक करण्याचा इरादा असल्याची शंका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी दीपाली सय्यद यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवल्याचे कळते.

तसेच पुढील काही दिवसात केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्याविरुद्ध SPG Act अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.गेल्या काही काळापासून सय्यद आक्रमपणे केंद्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. तसेच शिवसेना आणि आघाडी सरकारवर टीका करणाऱ्यांचाही प्रतिवाद करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe