अहमदनगर ब्रेकींग: एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत संंपविले जीवन

AhmednagarLive24 : लिंबाचे झाडाला गळफास घेत दत्तात्रय हरिभाऊ पोहळे (वय 55 मुळ रा. खरवंडी ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) यांनी आत्महत्या केली असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोखर्डी (ता. नगर) शिवारातील आकाश हॉटेलच्या समोर गणपती मंदिराशेजारी लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पोहळे यांनी गळफास घेतला. आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली.

दत्तात्रय यांना शिवम दत्तात्रय पोहळे यांनी उपचार करणे कामी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान दत्तात्रय हे उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहळे यांनी कोणत्या कारणातून गळफास घेतला याचा तपास पोलीस नाईक कावरे करीत आहेत.