सोशल मीडियावर पोस्ट करताना खबरदारी घ्या; एसपींनी दिले ‘हे’ आदेश

Published on -

Ahmednagar News : मागील काळात मंदिर व मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता नुपुर शर्मा प्रकरणामुळे सोशल मीडियात पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे. समाजात तेड निर्माण होईल अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सर्तक झाले आहे. यासाठी सायबर पोलीस काम करत आहे. त्यांचे सोशल मीडियावर विशेष लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात याप्रकरणी एका तरूणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी नगर शहरात एका युवकाने लाल किल्ला व तिरंगा ध्वजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. बजरंग दलाने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियात अशा तणाव निर्माण करणार्‍या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सायबर सेलसह पोलीस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून

तात्काळ कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करताना, सोशल मीडिया पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News