Peanut Farming: भुईमूग शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट; कमी वेळेत मिळणार लाखों, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Peanut Farming: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व्यवसायाशी (Farming) संबंधित आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून तेलबिया पिकांची शेती करत आहेत.

विशेष म्हणजे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची देखील ठरत आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांसाठी भुईमुगाची लागवड (Groundnut Farming) करण्याचा सल्ला देशातील कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देतं आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, भुईमूग (Peanut Crop) हे एक प्रमुख तेलबिया पिकांपैकी एक आहे. जे खरीप (Kharif Season) आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतकरी यावेळी भुईमुगाची लागवड करून अधिक उत्पादन घेऊ शकतात. मित्रांनो आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, भारतात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते.

आपल्या राज्यात देखील भुईमूग लागवड विशेष उल्लेखनीय आहे. एका अहवालानुसार, एकट्या राजस्थानमध्ये 3.47 लाख हेक्टर क्षेत्रात भुईमुगाची लागवड केली जाते. यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना भुईमूग शेती संदर्भात काही महत्वाची माहिती दिली आहे.

भुईमूग लागवडीची तयारी:- शेतकऱ्यांनी कमी पाणी साचलेल्या, भुसभुशीत, चिकणमाती, वालुकामय चिकणमाती आणि तांबड्या जमिनीत त्याची लागवड करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यासाठी प्रथम माती फिरवणाऱ्या नांगर किंवा हॅरोने नांगरणी सुरू करावी. त्याच्या बाजूला एक पाटा टाकून मातीला समतल करा.

भुईमूग लागवडीसाठी सुधारित वाण:- भुईमूग लागवडीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सुधारित जातीच्या शेंगदाण्याची लागवड करावी. जेणेकरून ते कमी वेळेत वाढून चांगले उत्पादन देऊ शकतील. त्यासाठी त्यांनी टीजी 37ए, दिव्या, मल्लिका, एचएनजी 123, नित्या इत्यादी वाणांची लागवड शेतकरी बांधव करू शकतात.

हे लक्षात ठेवा की, बियाणे हेक्टरी 60 ते 80 किलो या प्रमाणात शेतात टाकावे आणि खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारेच करावा. याशिवाय जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी या पिकाची पेरणी करू शकतात, असेही कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितचं भुईमूग लागवडीतून त्यांना चांगला बक्कळ पैसा हा मिळणार आहे.

भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पिक असल्याने बाजारपेठेत याची मागणी सदैव बनलेली असते अशा परिस्थितीत भुईमूग शेती शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची ठरणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe