Technology News : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी पोको (Smartphone maker Poco) आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. POCO या महिन्यात २३ जून (23 June) रोजी POCO F4 5G फ्लॅगशिप फोन भारतात आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
कंपनी 20:00 GMT वाजता या स्मार्टफोनचा ग्लोबल लॉन्च इव्हेंट (Global launch event) आयोजित करेल. POCO च्या जागतिक ट्विटर हँडलने पुष्टी केली आहे की ते POCO F4 5G सोबत POCO X4 GT लाँच करणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून, POCO X4 GT बाबत अनेक लीक अहवाल समोर आले आहेत. Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने गेल्या महिन्यात चीनमध्ये Redmi Note 11T Pro ची घोषणा केली. अहवालांवर विश्वास ठेवला तर, X4 GT ही Note 11T Pro ची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल.
POCO F4: संभाव्य वैशिष्ट्ये
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, POCO F4 मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले फुल HD+ रिझोल्यूशनसह असेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. X4 GT डायमेंशन 8100 चिपसेटसह येईल.
याशिवाय, हा स्मार्टफोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 अंतर्गत स्टोरेजसह देखील येऊ शकतो. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असेल.
हे साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, इन्फ्रारेड सेन्सर, डॉल्बी अॅटमॉस, ड्युअल स्पीकर आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी पोर्टसह सुसज्ज देखील असू शकते.
मागील रिपोर्टनुसार, फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलसह ट्रिपल कॅमेरा (Triple camera) सेटअप दिला जाऊ शकतो, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
नवीनतम अहवालांवर विश्वास ठेवला तर, POCO X4 GT च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ४८-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा असेल.