Ahmednagar News : उसापासून साखरनिर्मिती करताना वीज, इथेनॉल तयार करण्याच्या प्रक्रियेत स्पेन्टवॉश निघतो. तो बॉयलरमध्ये जाळल्यानंतर पोटॅश निघते. त्यालाही मागणी आहे. कारखान्यांनीही वेस्ट टू वेस्टमधून पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार केला, तर हायड्रोजनवर गाड्या चालतील.
तेव्हा आता पेट्रोलला हद्दपार करण्याची वेळ आली असून इथेनॉलचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जादाता बनला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अकोल्याला बोलताना ते म्हणाले की,चालू वर्षी ३४० लाख मे.टन साखर निर्मिती झाली आहे.
देशात साखरेचे उत्पादन सरप्लस आहे. आता कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता इतर उत्पादनाकडे वळले पाहिजे. मी राज्यात मंत्री असताना निळवंडेचे नाव अनेकदा मंजुरीसाठी ऐकून होतो. आज हेलिकॉप्टरमधून येताना कालवे पाहिले, तर समाधान वाटले. धरण होऊन तुमच्या शेताला पाणी येत आहे. निळवंडेसाठी पिचड यांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे ठरले.