शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर भरदिवसा फोडले अन…!

Ahmednagar News : दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्याने घराला कुलूप लावून शाळेत गेलेल्या शिक्षिकेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना भरदिवसा नवनागापूर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली.

याबाबत उज्ज्वला कैलास नांगरे (रा.शिवपार्वती अपार्टमेंट, शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नांगरे या शिक्षिका असून गुरुवारी त्या घराला कुलूप लावून शाळेला गेलेल्या असताना

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून बेडरुममधील कपाटात ठेवलेले पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण व रोख रक्कम असा ४० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. नांगरे या सायंकाळी शाळेतून आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.