Ahmednagar– संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.
मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या नवीन जिल्हाधिकारी परिसरात नसणाऱ्या मूलभूत सुविधा.
परिसरात बँक नाही, झेरॉक्सची सुविधा नाही इतकेच नाहीतर संपूर्ण परिसरात योग्य पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा नाही. यामुळे अनेक नागरिकांना दररोज अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरीही देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
मागच्या सहा महिन्यापूर्वी शहरातील नगर-औरंगाबाद रोड परिसरात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नवीन जिल्हाधीकारी इमारतीचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील नागरिकांचे हाल सुरू झालेले आहेत. ते अद्यापही कायम आहे.
कामासाठी कार्यालयात निवेदन देतांना अनेकदा झेरॉक्सची आवश्यकता भासते मात्र परिसरात ही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचण येत आहे. तसेच जिल्हयातील इतर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी कार्यालयात उपाहारगृहाची सोय आहे मात्र त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच चहापासून ते जेवणापर्यंतची गैरसोय सहन करावी लागत आहे.
तसेच माहिती अधिकारात माहिती घेताना, अनेकांना त्याचे शुल्क भरावे लागते. त्यासाठी जवळपास बँक नसल्याने गैरसोय होत आहे. प्रशासनाने नागरिकांची होणारी गैरसोय ओळखून ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या आहेत असुविधा
नागरिकांना कार्यालयाच्या आवारात पार्किंगला मज्जाव
कार्यालयाच्या परिसरात झेरॉक्सची सोय नाही
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास बँक नाही
उपाहारगृह नसल्याने चहा व नाश्त्याची सोय नाही
लिफ्टमध्ये कोणते दालन कितव्या मजल्यावर सूचना फलक नाही
पिण्याचे पाणी उपलब्ध, पण ग्लास नाहीत.