Shankarrao Gadakh – सध्या संपूर्ण देशाचा लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेनाचे (Shiv Sena)दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे 30 पेक्षा जास्त आमदार फोडून सत्ताधारी महाविकास आघडी सरकार (MVA) विरुद्ध बंड केला आहे.
या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार आणि काही अपक्ष आमदारांना एकत्र करून हा बंड केल्यामुळे सध्या शिवसेनामध्ये दोन गट निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar district) शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) सध्या कुठे आहे ते कोणत्या गटाला पाठिंबा देणार याची जोराने चर्चां सुरु आहे.
नेवासा मतदारसंघातून 2019 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता आणि मातोश्रीवर (Matoshri) जाऊन शिवबंधन बांधले होते. त्यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute)यांचा पराभव केला होता.
त्यामुळे गडाख कोणाला पाठिंबा देणार याची चर्चां सध्या जिल्हात जोराने पहायला मिळत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार शंकरराव गडाख सध्या आजारी असून ते मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहे.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या गटाला पाठिंबा दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. आजारपणामुळे ते सध्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीला हजर राहिले नाही.
विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर काही वेळातच बाहेर या राजकीय घडामोडी सुरू झाल्या.
तेव्हा गडाख रुग्णालयात होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ते मुंबईतच विश्रांती घेत आहेत. ते ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे.