बिग ब्रेकिंग : अजित पवार यांच्याबद्दल धक्कादायक बातमी !

Published on -

Maharashtra news : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यांनी स्वत: ट्विटक करून याची माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

पवार स्वत: मोठी दक्षता घेत असतात. तरीही त्यांना पुन्हा एकदा कोरोनाने गाठले आहे. राज्यात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरू असताना एका पाठोपाठ मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News