Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे निश्चित झाले आहे. मात्र या सरकारचा शपथविधी कधी होणार, याची आता उत्सुकता आहे
फडणवीस आज नव्हे तर उद्या १ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. मुंबईत आज फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात महाराष्ट्र भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
त्यामध्ये संबंधीचा निर्णय होईल. तोयपर्यंत राजभवानावरील प्रक्रियाही पूर्ण होईलठाकरे यांच्या राजीनाम्यानंत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “पुढचे अडीच वर्षांचे सरकार हे त्यापुढची पंचवीस वर्षे चालेल. पुढील वाटचालीबाबत गुरुवारी भूमिका स्पष्ट करणार आहोत.’’
दरम्यान,शिवसेनेचे बंडखोर आमदार रात्री गोव्यात पोहोचले. गोव्यात पणजीतील ताज हॉटेलमध्ये ते उतरले असून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही हॉटेलमध्ये पोहचले होते.