Important rules change : 1 जुलैपासून ‘हे’ महत्त्वाचे नियम बदलणार ; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

July 1, 'this' will change important rules;

Important rules change : येत्या महिन्यात जुलैची (July) पहिली तारीख म्हणजे उद्यापासूनच अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. 1 रोजी होणार्‍या या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर होईल.

या बदलांमध्ये एलपीजीच्या किमती, CNG किमती, बँकिंग, क्रिप्टो गुंतवणुकीशी संबंधित अतिशय महत्त्वाचे बदल समाविष्ट आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलणार

सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात आणि जागतिक बाजारातील किंमतीनुसार त्यांच्या किमती वाढवल्या किंवा कमी केल्या जातात. 1 जुलै रोजी त्यांच्या किंमतींमध्ये बदल होईल जे वाढू किंवा कमी होऊ शकतात. कंपन्या घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचे पुनरावलोकन करतात.

सीएनजीचे दरही बदलू शकतात

एलपीजी प्रमाणेच सरकारी कंपन्या सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमतीही बदलू शकतात. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, 1 जुलै रोजी सीएनजीच्या किमतीतही बदल दिसून येऊ शकतो. सीएनजीशिवाय हवाई इंधनाच्या किमतीही वाढू शकतात. सध्या एटीएफच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत.

क्रिप्टो गुंतवणूकीवरही कर आकारला जाईल

1 जुलै 2022 नंतर, जर क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार एका वर्षात 10,000 रुपयांपेक्षा जास्त झाला तर त्यावर एक टक्का शुल्क आकारला जाईल. आयकर विभागाने आभासी डिजिटल मालमत्तेसाठी टीडीएस नियमांची अधिसूचना जारी केली आहे. सर्व NFT किंवा डिजिटल चलने या नियमांच्या कक्षेत येतील.

केवायसी नसलेली डीमॅट खाती बंद केली जातील

डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. ज्या खात्यांमध्ये eKYC नसेल ते बंद केले जातील आणि 1 जुलैपासून अशा खात्यांद्वारे शेअर बाजारातील व्यवहार करता येणार नाहीत. डिमॅट खात्यात असलेले शेअर्स आणि सिक्युरिटीज काढणेही आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe