India News:मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधत भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेल्या खऱ्या पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही.
उलट कोर्टाने त्यांना कठोर शब्दात फटकारले आहे. ‘तुम्ही देशातील वातावरण बिघडवले आहे, देशाचा अपमानही झाला आहे, त्यामुळे टीव्हीवर येऊन जाहीर माफी मागा,’ असे कोर्टाने त्यांना सुनावले आहे.

शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतासह संपूर्ण जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. शर्मा यांच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
त्या सर्व याचिका दिल्लीत वर्ग करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. पण त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.न्यायालयाने त्यांना सांगितले की, तुम्ही केलेले वक्तव्यामुळे फक्त देशातील वातावरण बिघडले नाही तर त्यामुळे देशाची बदनामी देखील झाली.
तुम्ही जी माफी मागितली ती देखील सशर्त होती. सत्तेची ताकद डोक्यात जाऊ नये. तुम्हाला असे वक्तव्य देण्याची गरजच काय होती, असा संतप्त सवाल न्यायालयाने केला. तर शर्मा यांना धमक्या देणाऱ्या लोकांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले.