मुख्यमंत्री शिंदे गोव्यात, इकडे फडणवीस लागले कामाला

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news:काल शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सहकारी बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गोव्याला गेले आहेत, तर इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत.

आपल्या सरकारी निवासस्थानी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ते पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याने गृहखाते फडणवीस यांच्याकडे दिले जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्तांनंतर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. याशिवाय सरकारी आणि राजकीय कामकाजही तेथूनच फडणवीस पहात आहेत. अधिवेशनाची तयारी, विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार ठरविणे, मंत्रीपदासंबंधीची चर्चा अशा कामकाजावर फडणवीस लक्ष ठेवून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe