Excise Duty Hike : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेल (Petrol And Diesel) आणि एटीएफ (ATF) निर्यातीवरील (Export) उत्पादन शुल्क (Excise Duty Hike) वाढवले आहे. पेट्रोलवरील निर्यात उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ६ रुपये तर डिझेलवर १३ रुपयांनी वाढ केलेली आहे.
त्याचबरोबर सोन्याच्या (Gold) आयात (Import) शुल्कात तब्बल पाच टक्क्यांनी वाढ केली आहे.सोन्याच्या वाढत्या मागणीला आला घालण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परंतु याचा थेट सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Level) तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादकांना विंडफॉल नफ्याच्या बदल्यात सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर प्रति टन 23,230 रुपये अतिरिक्त कर लादला आहे.
सोने महाग होईल
त्याचवेळी सरकारने सोन्याच्या आयातीवरील मूळ आयात शुल्क 12.5 टक्के केले. यापूर्वी त्याचा दर ७.५ टक्के होता. त्यामुळे सोने खरेदी अधिक महाग होईल.
निर्णय का घेतला गेला
निर्यातीवरील कर तेल रिफायनरीजसाठी आहे, विशेषत: खाजगी क्षेत्र, ज्यांना युरोप आणि अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये इंधनाची निर्यात करताना महत्त्वपूर्ण फायदा मिळतो. दुसरीकडे, देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर लावला जाणारा कर हा स्थानिक उत्पादकांसाठी आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या उच्च किमतींचा लाभ मिळत आहे.