CIL Recruitment 2022 : कोल इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Pragati
Published:

CIL Recruitment 2022 : कोल इंडियात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कोल इंडियाने (Coal India) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या विविध पदांसाठी (Post) भरतीसाठी अर्ज मागवून घेण्यास सुरुवात केली आहे.(Coal India Limited Recruitment)

या पदांसाठी २३ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून २२ जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज दाखल केला नसेल तर ते coalindia.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात.

अनेक पदांसाठी भरती
अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे खाण शाखेतील 699 पदे, सिव्हिलमधील 160 पदे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील 124 पदे आणि सिस्टीम आणि ईडीपीमधील 67 रिक्त पदांची भरती केली जाईल. GATE 2022 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

पात्रता काय असावी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या या पदांसाठी भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ (University) किंवा संस्थेमधून किमान 60% गुणांसह संबंधित विषयातील B.E / B.Tech / B.Sc पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज शुल्क
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 50,000 रुपये मूळ वेतन दिले जाईल. पात्र उमेदवार CIL मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रूटमेंट 2022 साठी अधिकृत वेबसाइट coalindia.in वर 22 जुलै 2022 किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यासाठी सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी आपण अधिकृत वेबसाइट तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe