उद्या विधानसभेत काय खेळी होणार, जयंत पाटील म्हणाले…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra Politics : नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राज्यातील सत्तानाट्य संपले, असे वाटत असतानाच राजकीय सोबत कायदेशीर खेळ्याही सुरूच आहेत. उद्या विधनसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र, ही प्रक्रियाही सहजासहजी होणार नाही, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.

हे कामकाज सध्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे, उद्या अध्यक्षपदाची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणे सभागृहाचे काम करण्याचा अधिकार आहेत.

किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे ती निरपेक्षपणे पार पाडतील असा विश्वास आहे. पाटील यांनी पुढे म्हटले आहे. आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही.

आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड राज्यपालांकडे मागण्यात आली होती परंतु राज्यपालांनी त्याला काही महिने परवानगी दिली नव्हती असेही पाटील यांनी म्हटले आहे.

एका बाजूला अध्यपदासाठी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रक्रियेत कायदेशीर कीस पाडण्याची तयारीही सुरू असल्याचे दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe