Maharashtra news:विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ कार्यालय रात्रीतून सील करण्यात आले आहे. सकाळी कामावर आलेले या कार्यालयातील सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेरच आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. त्यापूर्वीच हे कार्यालय सील करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे कार्यालय बंद करण्याचे पत्र देण्यात आल्याने ते सील करण्यात आले आहे.
शिवसनेची कोंडी करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे दिसून येते. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आलाय. पण, प्रतोद सुनील प्रभूंचा व्हिप आम्हाला लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाने केलाय. त्यामुळे पक्षादेशावरून बंडखोर आणि शिवसेनेत संघर्षाची शक्यता आहे.