White Hair Problem : सध्याची जीवनशैली पाहता केस पांढरे (White Hair) होणे ही फार मोठी गोष्ट नाही. खूप कमी वयातच काही लोकांचे केस पांढरे होतात. केसांवरच आपलं संपूर्ण सौंदर्य (Beauty) टिकलेले असते.
काही लोकं याला अनुवांशिक (Genetic) मानतात. तर काहीजण पांढऱ्या केसांशी तडजोड करतात (White Hair Problem). मात्र या समस्येतून सहज सुटका होऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात (Diet) बदल करावा लागेल.
ब्रोकोली :
ब्रोकोली (Broccoli) ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी मानली जाते. कारण या भाजीमध्ये फॉलीक ऍसिडमध्ये भरपूर असते. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. म्हणूनच ब्रोकोली नियमित खावी.
कढीपत्ता :
यामध्ये फॉलिक अॅसिड आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळेच या पानाचा अधिकाधिक जेवणात वापर केल्यास पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात.(Curry leaves)
हिरव्या पालेभाज्या :
या भाजीमध्ये फॉलीक अॅसिडचे भरपूर स्त्रोत आहेत. ज्याच्या मदतीने केस वाढणे थांबते, यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पालक, हिरवी धणे, मेथी यांचा समावेश करावा.
लोह आणि तांबे असलेले पदार्थ :
आपले केस तरुण वयात पांढरे होतात कारण आपल्या शरीरात लोह आणि तांबे यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा अभाव असतो. यासाठी मशरूम, बटाटे, अक्रोड यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.
ब्लूबेरी :
जर तुम्हाला पांढरे केस पुन्हा काळे व्हायचे असतील, तर त्यासाठी झिंक, आयोडीन आणि व्हिटॅमिन बी 12 सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांसह फळांच्या ब्लूबेरीचे सेवन करा.