मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमृता फडणवीसांनी दिलेल्या माहितीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायला जायचे, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
जॅकेट वगैरे घालून ते घराबाहेर पडायचे, डोळ्यावर चष्मा घालायचे. मलाही कधीकधी ओळखू यायचं नाही. -काही राजकीय घडामोड सुरु आहे?, असं मी विचारलं तर उत्तर द्यायचे नाही, टाळायचे, असंही अमृता फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील सभागृहातील एका भाषणात सरकार स्थापनेसंदर्भात अनेक गुपित गोष्टींचा उलगडा केला होता. ‘सत्तांतर काही एका दिवसात झालं नाही, मी आणि देवेंद्र फडणवीस अंधार झाल्यावर भेटायचो’, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.