Maharashtra news:शिवसेनेची पक्षशिस्त मोडून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुर्ची मिळवली आहे. मात्र, सर्वोच्च्य न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे.
न्यायालयाचा निकाल अद्याप येणे बाकी असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण येत्या आषाढी एकादशीला मुख्य शासकीय पूजा करण्यासाठी जाऊ नये, अशी मागणी नगरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे.

file photo
शिंदे यांनी पदभार देखील स्वीकारला परंतु त्यांचे पद कायम राहणार की नाही याचा फैसला येत्या ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायनिवाडा पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना मुख्यमंत्री मानणार नाही. तोपर्यंत शिंदे यांनी मुख्य शासकीय पूजेसाठी पंढरपूरला जाऊ नये, असे जाधव यांनी म्हटले आहे.