Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात अजूनही लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याने पुढील ५ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये दररोज पाऊस पडत आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल आदी राज्यांमध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती अनियंत्रित होऊ लागली आहे.

हवामान खात्यानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज ढगाळ वातावरण असेल. संध्याकाळी किंवा रात्री अनेक भागात रिमझिम पाऊस पडू शकतो. शनिवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
हिमाचल प्रदेशात पुढील तीन दिवसांत कांगडा, मंडी, सोलन आणि सिरमौर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. लाहौल स्पिती वगळता इतर जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने (IMD) अशा राज्यांची माहिती दिली आहे, जिथे पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस आणि गडगडाट होणार आहे. प्रवासी आणि पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान येथे ८ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल.
या 10 राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, पुढील पाच दिवस पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी, आयएमडीने ट्विट केले आहे की ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि माहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये ८ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 7 ते 9 जुलै दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पाऊस पडेल. 10 आणि 11 तारखेला मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.
याशिवाय 9 जुलैला कर्नाटकात मुसळधार पाऊस पडेल. तटीय आंध्र प्रदेशात ७, ८ आणि ११ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर तेलंगणामध्ये 7 आणि 8 जुलै आणि 11 जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल.