Galaxy Z Flip 4 : येत्या काही महिन्यांत आणखी अनेक स्मार्टफोन्स (smartphones) येणार आहेत. सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy Z Flip 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, हा सॅमसंग फोन मॉडेल क्रमांक SM-F721B सह BIS (Buro of Indian Standards) च्या वेबसाइटवर रिलीज करण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Flip 4 चे फीचर्स काही मीडिया रिपोर्ट्सद्वारे लीक झाले आहेत. तुम्हीही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या फोनवर एक नजर टाकू शकता. चला तर मग जाणून घेऊया या फोनचे फीचर्स.

Samsung Galaxy Z Flip 4 ची संभाव्य फीचर्स
Galaxy Z Flip 3 प्रमाणे, Flip 4 ला देखील ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यात 12 MP मुख्य कॅमेरा आणि 12 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये 10 MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
या फोनमध्ये Samsung Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
फ्लिप फोन असल्याने यात 2 डिस्प्ले स्क्रीन मिळतील. या फोनमध्ये 6.7 इंच स्क्रीनवर सुपर AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
Samsung Galaxy Z Flip 4 फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
कंपनी Samsung Galaxy Z Flip 4 फोनमध्ये 3,700 mAh बॅटरी देऊ शकते. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा 25 डब्ल्यूच्या वायर चार्जिंगसह आणि 10 डब्ल्यूच्या वायरलेस चार्जिंगसह दिली जाऊ शकते. Samsung Galaxy Z Flip 4 फोन 5G नेटवर्कसह येईल तसेच गोल्डन, ग्रे, ग्रीन, लाइट ब्लू, नेव्ही, पर्पल, सिल्व्हर, ब्लॅक आणि व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.