Maharashtra news:आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून निघालेल्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंढरी नगरी भक्तीरसात बुडाली आहे.
अशातच आज पहाटे निसर्गाने धक्का दिला आहे. पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.सकाळी ६.२२ च्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

कर्नाटकतील विजापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू होते. तेथे भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. पंढरपूरची यात्राही सुरळीत सुरू आहे.